पुष्प १ - विसापूर किल्ला
४५ व्या वर्षात पदार्पण करताना माझा बालमित्र अनंतप्रसाद देशपांडे याने वर्षभरात ४५ न पाहिलेले किल्ले बघायचा संकल्प सोडला . अनायसे माझ्याकडेही वेळ होता म्हणून मी पण त्याच्याबरोबर भटकंती करायची ठरवली . प्रोजेक्ट दुर्गमाला असे मी माझ्यापुरते नामकरण केले आणि ३० सप्टेंबर रोजी ' विसापूर ' किल्ल्याच्या रुपाने पहिले पुष्प ह्या माळेत ओवले गेले . पाटण गावाकडून गडावर शिरताना दिसणारा गडाचा बुरुज चोर दरवाजा खूपच सुस्थितीत असलेली गडाची तटबंदी गडावरून दिसणारे विलोभनीय दृष्य रानफुलांचा बहर