Posts

Showing posts from December, 2018

पुष्प १० - अचला किल्ला

Image
अहिवंत किल्ला बघून आणि काशिनाथ दादांचा निरोप घेऊन आम्ही अचला किल्ल्याच्या पायथ्याचे जामले-वणी हे गाव गाठले. गावात पाण्याच्या बाटल्या भरून घेऊन आणि भरत राहेरे ह्या गाईडला घेऊन आम्ही गड चढायला सुरुवात केली. आमच्या पैकी एक जण गावात तर दोन जण चढाईच्या सुरुवातीला गळाले पण बाकीच्यांनी गड सर करायची जिद्द दाखवली. ह्यावेळच्या चारही किल्ल्यांमध्ये अचला किल्ल्याची वाट सगळ्यात अवघड होती. खडा चढ, घसरडी खडी ह्यामुळे वेग मंदावला होता. त्यातच भर दुपारची वेळ असल्यामुळे ऊन पण चांगलेच तापले होते. पण तरीही केवळ दोन थांबे घेऊन आम्ही हा किल्ला सर केला जामले-वणी गावातून दिसणारा अचला आणि उजवीकडे टवळीचा डोंगर कातळात कोरलेल्या पायऱ्या गडावरचे उध्वस्थ देवस्थान गडावरुन दिसणारे विहंगम दृष्य कोळ्याचे वैशिट्यपूर्ण जाळे (funnel web)

पुष्प ९ - अहिवंत किल्ला

Image
रामशेज आणि देहेर बघून आम्ही दुपारी हॉटेल राजगड मध्ये जेवण केले. नंतर अहिवंत किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या दरेगाव ह्या गावात पोचलो. दरेगावच्या मारुती मंदिरात झोपण्याची सुरेख सोया झाली. मंदिर छान मोठं आहे. जवळजवळ २५-३० लोकं सहज इथे झोपू शकतात. मंदिराशेजारीच राहणाऱ्या काशिनाथ गायकवाड ह्यांनी आमची जेवण्याची व्यवस्था केली. गरम गरम चपात्या, पिठलं, भात आणि ताक असं सुग्रास जेवण झाल्यानंतर सगळे गाढ झोपी गेले. सकाळी काशिनाथ दादांनी दिलेल्या कोऱ्या चहामुळे ताजेतवाने होऊन आम्ही त्यांच्या बरोबरच अहिवंत किल्ल्याकडे कूच केले. किल्ल्याचा भव्य विस्तार बाळंतिणीचे टाके - इथल्या पाण्यानी आंघोळ केली तर गोवर सारखे  त्वचारोग बरे होतात अशी इथल्या लोकांची समजूत आहे किल्ल्याचे भग्न प्रवेशद्वार आणि पायऱ्या किल्ल्यावरचे देवस्थान हा खेळ सावल्यांचा 😄 किल्ल्यावरची गुहा - इथे सहज १२-१५ लोकांची राहण्याची सोय होऊ शकते.  जेवण बनवण्यासाठी दगडी चूल पण येथे आहे

पुष्प ८ - देहेर किल्ला

Image
रामशेज किल्ला बघून आणि न्याहारी आटोपून आम्ही देहेर किल्ल्याच्या पायथ्याच्या देहेरवाडी मध्ये पोचलो. गावातून सोमनाथ आणि त्याचे दोन मित्र आमच्याबरोबर गाईड म्हणून यायला तयार झाले. किल्ला फार उंच नसला तरी संपूर्ण खडी चढण होती. त्यातच ऊन वाढू लागल्यामुळे ग्रुपची बरीच दमछाक झाली गडाच्या मध्यावरचे पठार क्षण विश्रांतीचे 😊 महादेव स्थान कातळात कोरलेल्या पायऱ्या देहेर वरुन दिसणारा भोरगड हा वायुसेनेच्या ताब्यात आहे. रडार आणि इतर दूरस्थ माहिती मिळवणारी उपकरणे इथे स्पष्ट दिसतात यशस्वी चढाई करुन परतणारे वीर मावळे 😁

पुष्प ७ - रामशेज किल्ला

Image
नोव्हेंबर महिन्यातील ४ किल्ल्यांपैकी पहिल्या रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी आम्ही पहाटेच पोचलो. गाडीमध्येच छोटीशी डुलकी काढून सकाळी ६:३० च्या सुमारास आम्ही किल्ला चढायला सुरुवात केली. किल्ला तसा छोटेखानी आहे आणि त्यामुळे नाशिककरांच्या आवडीचा. सकाळपासूनच कुटुंबासमेत लोक किल्ल्यावर जाताना दिसत होती. खिडकी बुरुज गडावरची टाकी - गडावर जवळजवळ १०-१२ टाकी आहेत गडाची माची - येथे एक मोठा भगवा ध्वज आहे भगवती देवी रामशेज वरुन दिसणारी डोंगररांग - डावीकडे भोरगड, मध्ये देहेर किल्ला, उजवीकडे डोंगी