पुष्प १० - अचला किल्ला
अहिवंत किल्ला बघून आणि काशिनाथ दादांचा निरोप घेऊन आम्ही अचला किल्ल्याच्या पायथ्याचे जामले-वणी हे गाव गाठले. गावात पाण्याच्या बाटल्या भरून घेऊन आणि भरत राहेरे ह्या गाईडला घेऊन आम्ही गड चढायला सुरुवात केली. आमच्या पैकी एक जण गावात तर दोन जण चढाईच्या सुरुवातीला गळाले पण बाकीच्यांनी गड सर करायची जिद्द दाखवली. ह्यावेळच्या चारही किल्ल्यांमध्ये अचला किल्ल्याची वाट सगळ्यात अवघड होती. खडा चढ, घसरडी खडी ह्यामुळे वेग मंदावला होता. त्यातच भर दुपारची वेळ असल्यामुळे ऊन पण चांगलेच तापले होते. पण तरीही केवळ दोन थांबे घेऊन आम्ही हा किल्ला सर केला
जामले-वणी गावातून दिसणारा अचला आणि उजवीकडे टवळीचा डोंगर
कातळात कोरलेल्या पायऱ्या
गडावरचे उध्वस्थ देवस्थान
गडावरुन दिसणारे विहंगम दृष्य
कोळ्याचे वैशिट्यपूर्ण जाळे (funnel web)






Comments
Post a Comment