पुष्प ९ - अहिवंत किल्ला



रामशेज आणि देहेर बघून आम्ही दुपारी हॉटेल राजगड मध्ये जेवण केले. नंतर अहिवंत किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या दरेगाव ह्या गावात पोचलो. दरेगावच्या मारुती मंदिरात झोपण्याची सुरेख सोया झाली. मंदिर छान मोठं आहे. जवळजवळ २५-३० लोकं सहज इथे झोपू शकतात. मंदिराशेजारीच राहणाऱ्या काशिनाथ गायकवाड ह्यांनी आमची जेवण्याची व्यवस्था केली. गरम गरम चपात्या, पिठलं, भात आणि ताक असं सुग्रास जेवण झाल्यानंतर सगळे गाढ झोपी गेले. सकाळी काशिनाथ दादांनी दिलेल्या कोऱ्या चहामुळे ताजेतवाने होऊन आम्ही त्यांच्या बरोबरच अहिवंत किल्ल्याकडे कूच केले.


किल्ल्याचा भव्य विस्तार

बाळंतिणीचे टाके - इथल्या पाण्यानी आंघोळ केली तर गोवर सारखे त्वचारोग बरे होतात अशी इथल्या लोकांची समजूत आहे

किल्ल्याचे भग्न प्रवेशद्वार आणि पायऱ्या

किल्ल्यावरचे देवस्थान

हा खेळ सावल्यांचा 😄

किल्ल्यावरची गुहा - इथे सहज १२-१५ लोकांची राहण्याची सोय होऊ शकते. जेवण बनवण्यासाठी दगडी चूल पण येथे आहे

Comments

Popular posts from this blog

पुष्प ५ - रावळ्या किल्ला

पुष्प ६ - जावळ्या किल्ला

पुष्प ८ - देहेर किल्ला