Posts

Showing posts from November, 2018

पुष्प ६ - जावळ्या किल्ला

Image
रावळ्याला भेट देऊन आम्ही परत मधल्या पठारावर आलो आणि थोडासा नाश्ता करून जावळ्याकडे कूच केले. रावळ्याच्या मानाने जावळ्या तसा चढायला सोपा आहे. जावळ्याकडे कूच भग्नावस्थेतली तटबंदी गडाचा दरवाजा दरवाज्या शेजारी असणारा फारसी शिलालेख ट्रेक सफल संपन्न 😃

पुष्प ५ - रावळ्या किल्ला

Image
२८ ऑक्टोबर ला सकाळी शांताराम मामांचा निरोप घेऊन आम्ही रावळ्या आणि जावळ्या ह्या जुळ्या किल्ल्यांकडे कूच केले. मुळाणे (जांभुळपाडा) गावातून दोन्ही गडांच्या मधल्या पठारावर पोचलो. तिथे कृष्णा गावित आणि युवराज जगताप ह्या गाईड्सना बरोबर घेऊन दोन्ही किल्ल्यांची सफर केली. मुळाणे गावातून दिसणारी दुक्कल, डावीकडे जावळ्या आणि उजवीकडे रावळ्या रावळ्या आणि शेजारचा डोंगर ज्याला 'तवा' म्हणतात रावळ्याच्या शिखरावर जाणारी चिंचोळी घळवाट. ह्या पुढचा रॉकपॅच अजूनच अवघड होता वाटेत दिसलेली विचित्र वनस्पती

पुष्प ४ - कण्हेर गड

Image
मार्कंडेय आणि सप्तशृंग गड करुन आम्ही कण्हेर गडाच्या पायथ्याला कण्हेरवाडीत पोचलो. गावातून विजय आणि सोमनाथ ह्या छोट्या गाईड्सना घेऊन कण्हेरगडाची सफर केली. विजयचे वडील शांताराम खिलारे यांनी त्यांच्या घरी आमची जेवण्याची आणि राहण्याची सोय केली. गड चढाईचा पहिला टप्पा गडावरच्या नेढ्यात गडावरून होणारे धोडप किल्ल्याचे दर्शन शांताराम खिलारे यांचेबरोबर. त्यांच्या मनाची श्रीमंती एव्हढी की सगळी सोय करुनही ते पैसे घ्यायला तयार नव्हते. शेवटी प्रेमळ दमदाटी करून आम्ही त्यांना थोडे पैसे घेण्यास भाग पाडले.

पुष्प ३ - सप्तशृंग किल्ला

Image
मार्कंडेयावरून घळीत उतरुन सप्तशृंग गडावर जाण्याच्या मार्ग विलक्षण उत्कंठापूर्ण होता. थोडे घसरत थोडे सांभाळत यशस्वी चढाई करून सप्तशृंगीचे पठार गाठल्यावर झालेला आनंद शब्दातीत होता मार्कंडेयावरून होणारे सप्तशृंग गडाचे दर्शन मार्कंडेयाच्या दांड्यावरुन येणारी वाट शेवटची कातळ चढण गडाच्या पायथ्याशी पसरलेले जंगल विहंगम पॅनोरामा , डावीकडे सप्तशृंग आणि उजवीकडे मार्कंडेय

पुष्प २ - मार्कंडेय किल्ला

Image
सप्टेंबरच्या पहिल्या ट्रेक नंतर ऑक्टोबर मध्ये एकदम ५ किल्ले करायचा बेत होता. दोन दिवसात ५ किल्ले प्रथमच करणार असल्यामुळे जरा काळजी वाटत होती पण अखेरीस सगळं ठरवल्याप्रमाणे घडलं आणि मोहीम यशस्वी झाली. दुसरे पुष्प होते 'मार्कंडेय किल्ला' मार्कंडेयाच्या पठारावरून दिसलेले पहाटरंग किल्ल्याच्या पायथ्याला वसलेली कालीमाता माथ्यावरचे मार्कंडेय ऋषींचे मंदिर मार्कंडेयाची कड्याची बाजू